Saturday, October 24, 2015

समाज मनातिल वैचारिक दुष्काळ

बर्याच दिवसांनी लेख लिहीण्याचे कारण म्हणजे , मला इतर तत्सम धार्मिक विषय सोडून दूसरे विषय मिळत नव्हते, एव्हाना मी स्वत: जाणिवपूर्वक धार्मिक व जातियवादी मुद्दे टाळतोय, परंतु ह्या विषयांकडे 100% दूर्लक्ष करुन चालणार नाही.

आजपासून ६० वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय भेदभाव करणाऱ्या व दलितांवर अन्याय करणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करून त्यांच्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारला. ज्या धर्मवेड्या हिंदू समाजाने बाबासाहेबांचे काही एक ऐकले नाही, त्यांचा पदोपदी दलित म्हणून विरोध केला गेला. पण आपण जर आपल्या भारतीय संस्कृतीकडे जर पहिले तर आपल्याला " वसुधैव कुटुम्बकम " ही व्यापक संकल्पना दिसून येते, पण त्या सर्व समावेशक संकल्पाने कडे आपण सकारात्मकतेने बघताना दिसून येत नाही. हे बोलणे का गरजेचे आहे ??? किंवा मी हे सर्व तुम्हा सर्वाना का सांगतोय ???? ह्यालाही भरपूर कारणे आहेत मित्रांनो, कारण आजकाल जात, धर्म, हे मुद्दे फार प्रचंड प्रमाणात बोलले जात आहेत, एव्हाना मी म्हणेन कि ह्याचा सर्वाना वीट आलाय !! जिकडे जाल तिकडे हेच ऐकायला मिळते, कारण ऐकवणारे (भारतातील प्रसार माध्यमे) तुम्हाला हेच ऐकवू इच्छितात.

जर २१ व्या शतकाचा तुम्ही एकंदरीत आढावा घेतला तर तुमच्या असे लक्षात येईल कि; धार्मिक दंगलीमध्ये वाढ झालेली दिसून येईल. हे असे का झाले असावे?? आपल्याला माहित आहे कि ह्या गोष्टी समाज हितासाठी योग्य नाहीत, तरीही ह्या गोष्टी का घडत असतात ह्याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. पण असा विचारविनिमय होत नाही, का होत नाही ?? तर इथे प्रत्येकाला आपला धर्म आपली जात प्राणप्रिय आहे, आपले दैवत, कुलदैवत, इष्टदैवत, आराध्यदैवत प्राणप्रिय आहे, पण त्यांची शिकवण काय हे कुणीही शिकून घ्यायला तयार दिसत नाही, कपाळावर टिके, चंद्रकोर लावायची आणि जय श्री राम, जय शिवराय करत बोंबलत फिरायचं, नाहीतर निळे कपडे घालून लोकेट घालून जय भीम करायचं नावापुढे कट्टर हिंदू , गौरक्षक किंवा शिवभक्त, भिम योद्धा, भीम सैनिक लावायचं आणि आपला पोकळ धार्मिकपणा facebook, whatsapp वर दाखवायचा पण ते का लावतात त्याच अध्यात्मिक महत्व काय?? सामाजिक महत्व काय ?? हे शिकून घ्यायचं नाही. एव्हाना तशी मानसिकताही नाही. तर समरसता येणार तरी कुठुन?? आभाळातून पडणार आहे?? का भगवन् ढगातून तथास्तू म्हणणार आहेत??

सर्वप्रकारच्या वाढत जाणार्या जातीय तथा धार्मिक दंगली ह्या देखील प्रसारमाध्यमांसाठी एक कच्चा माल बनत चालल्या आहेत, आणि TRP म्हणजे प्रसारमाध्यमांची प्राणप्रिय गोष्ट आहे, जशी आपली आहे ना तशीच. प्रत्येक गौहत्येची खबर फक्त हिंदूंनाच मिळते, प्रत्येक दलित अत्याचार/हत्याकांडाची खबर फक्त दलितांनाच मिळते, मी तर असे म्हणेन कि प्रसारमाध्यमे ह्या गोष्टी फिल्टर करून एका विशिष्ट जाती धर्माला अंतर्गत गृहयुद्ध साठी भडकविण्याचा प्रयत्न करत असते, व ह्यांना कोण्या कोण्या देशातल्या माफिया मंडळींपासून अनुदान मिळते, हे तर सर्वांना माहीतच आहे.

कुछ तूम कहो, कुछ हम कहे  (तूम पाकिस्तानका निषेध करो, हम तूम्हारा निषेध करेंगे)

"शिवसेना" हे नाव ऐकताक्षणी मनात स्वाभिमान उफाळून येतो, मनात आपुलकीची भावना निर्माण होते कि आपल्या ह्या धर्मवेड्या समाजाला शिवप्रेरणेने वैचारिक दिशा दाखविणारी कुणी एक विश्वसनिय संघटना आहे, जी आपल्या धर्माला इतर धर्मद्वेष्ट्या लोकांपासुन वाचवते. शिवसेनेचा आधारस्तंभ कालवश झाला परंतु शिवसेनेचा र्हास झाला नाही अजूनही तीच झंजावाती घौडदौड चालूच आहे आणि एक शिवसैनिक म्हणुन नव्हे तर एक भारतीय म्हणुन मला ह्याचा प्रचंड अभिमान आहे. सध्या सेने विरोधात संघाविरोधात व इतर बंधूधर्म पाळणार्या समवैचारिक हिंदू संघटणा ह्याना विरोध होण्याचे कारण काय???? आणि ह्यांना धार्मिक ऐवजी धर्मांध म्हणुन विरोध करणारी चेंगट चमू कोण???? हे जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे.

स्वयंघोषित पुरोगामी मंडळी पुरोगामीत्वाची शाल पांघरुन आपल्या मार्क्सवादी/फॅसिस्ट विचारसरणीचा डावा अजेंडा जोमाने पुढे रेटत आहे, ह्यांना म्हणे धर्म ही संकल्पनाच मान्य नाही, तर का मान्य नाही ???? तर म्हणे तुमचा हिंदू धर्म हा समाजाच्या वैचारिक प्रगतीच्या आड येतो, (हसा लेकांनो हसा बघा जरा भारतीय संस्कृति व सभ्यता पाळणार्यांना डावी मंडळी वैचारिक डोस देऊ पाहात आहेत) , अश्या तिरस्काराच्या भावणेने केलेले पोरकट विधान ऐकल्यावर बाळासाहेबाच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातील संदर्भ आठवतो , बाळासाहेब म्हणाले होते की " धर्म हा असा असला पाहिजे की जो समाजाच्या सर्वांगिण प्रगतीच्या आड येता कामा नये ". त्याला म्हणावे धर्म . आदरणीय शिवसैनिक सर्वांचे लाडके दादा कोंडके यांनी त्याच शिवाजी पार्कवर जात, धर्म, जातियता , धर्मांधता आणि राजकीय सर्वधर्मसमभाव ह्या संकल्पनांवर भाष्य केले होते, कुणाला बाळासांहेबाच्या व दादांच्या भाषणाच्या रेकॉर्डींग शहानिशा करण्यासाठी हव्या असतिल तर कमेंटमधे नंबर टाकावा.

मागिल महिण्यात पूज्यनिय सरसंघचालकांनी हिंदू जनतेला धर्मातिल अंधश्रद्धा व विज्ञानविरोधी चालीरितींचा त्याग करण्याचे आवाहन केले होते, कदाचित ह्या बातमीला जास्त प्रसिद्धी मिळाली नसेल म्हणुन मुद्दाम सांगतोय. मला हे अजूनही उमजत नाहिए की हे सगळे धर्मबूडवे लोकं हिंदू धर्माला विज्ञानविरोधी सिद्ध करण्याचा प्रयत्न का करत आहेत????

हे लोक हिंदू संघटनांचा विरोध का करत आहेत???? तर पाकिस्तानाला विरोध केला म्हणून का म्हणजे फक्त हिंदूसंघटनांना तोंडावर पाडण्यासाठी ह्या ढेकणांचा आटापीटा सुरु आहे , ह्यात प्रसारमाध्यमांनीही "चैनसे सोना है तो जाग जाओ" करत हिंदूत्वविरोधी लढ्यात वैचारिक उडी घेतलीए, हिंदू सणऊत्सवालाच विरोध का होतोय ईदला होणारी कत्तल व त्यासाठी करोडो लिटर पाणी रक्त धूण्यासाठी वापरलं जातं त्याचं काय???? क्रिसमसला निरुपयोगी झाड सजवून संटा झंटा वाले कपडे घालून रातभर तेरीमेरी क्रिसमस करत बोंबलत फिरतात अश्या नौटंकीबाज सणउत्सवांबाबत काय????

हिंदूधर्मातिल वेद, पुराण,रामायण महाभारत या बाबत वैज्ञानिक पुरावे मिळल्या नंतरही ह्यांना खोटं / काल्पनिक व विज्ञान विरोधी ठरवण्याचा प्रयत्न का केला जातोय????
(कुण्याही व्यक्तिने मला ह्याचे उत्तर द्यावे), जर समजा यदाकदाचित त्यांनी तसं केलं तर ह्याने त्यांचा काय फायदा???? (कदाचित हिंदूधर्माचं नुकसान करणे, बदनामी करणे हेच त्यांचे परमध्येय असु शकते)
सेना , संघ व तमाम हिंदूत्ववादी संघटनांवर बंदी घाला अथवा त्यांना आतंकवादी/दहशतवादी संघटन घोषित करा अशी मागणी कोण करतंय???? तर तत्सम झाडूनपूसुन गोळा केलेले डावे, (लाल, निळे, काळे, पिवळे, हिरवे कलरफूल) पँथर, विविध नमुन्याचे कोब्रे आणि समवैचारिक माओवादी व नक्षलवादी मंडळी, जातीयवादी, (हिंदूंचे  नाव वापरणारे )ब्रिगेड, सर्व प्रकारचे इस्लामी संघटन, छूपेरुस्तम चर्चचे पादरी व देशाबाहेरिल सांगायचं झाल्यास पाकिस्तानातिल राजकीय पक्ष.

मित्रांनो आता तुम्हीच ठरवा की हे आरोप करणारे लोक हिंदू समाजाबद्दल काय बोलतात व ह्यांची लायकी काय????


आपला मित्र सत्यम अवधूतवार

Twitter - @AvdhutwarSatyam
Facebook - https://www.facebook.com/satyam.avdhutwar
Email ID - satyamavdhutwar@gmail.com